Zero Hour Guest Centre : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, संतोष देशमुख प्रकरणाचं राजकारण होतंय?

Zero Hour Guest Centre : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, संतोष देशमुख प्रकरणाचं राजकारण होतंय?

 मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही. त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात येईल जेणेकरून गुन्हेगारांना एक संदेश मिळेल असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देशमुख कुटुंबीयांना दिला. संतोष देशमुख प्रकरणात जे कुणी गुन्हेगार असतील त्यांना माफी नाही. यामागे कुणीही असेल त्याला शिक्षा मिळेल असंही मुख्यमंत्र्यानी आश्वासित केल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली. संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि न्याय मिळावा अशी मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे आमदार सुरेश धस होते. 

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणाले की, "आमच्याकडे काही गोष्टी आणि पुरावे होते ते मुख्यमंत्र्यांना दाखवले, त्यावर चर्चा केली. आमची भूमिका ही न्यायाची आहे. आम्हाला फक्त न्याय हवा. निपक्षपातीपणे तपास झाला पाहिजे. या मागे कुणीही असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आम्ही केली. एफआयआरमध्ये ज्या काही गोष्टी आहेत, त्यामधील सर्वांचे सीडीआर तपासावे अशी मागणी आम्ही केली."

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola