Zero Hour Guest Center : आरक्षणाच्या मुद्द्यावर कायदा काय सांगतो ? Siddharth Shinde Exclusive

Zero Hour Guest Center : आरक्षणाच्या मुद्द्यावर कायदा काय सांगतो ? Siddharth Shinde Exclusive

आरक्षणाबाबत (Reservation) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आरक्षण 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत जाऊ द्या, ज्याला मिळाले नाही त्याचा 25 टक्क्यांमध्ये समावेश करता येतील असे मत शरद पवार यांनी केलं. यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार  घ्यावा, आम्ही त्याबाबाबत पाठींबा देऊ असेही शरद पवार म्हणाले. 

मराठा आरक्षण मिळावे ही लोकांची भावना 

मराठा आरक्षण मिळावे ही लोकांची भावना असल्याचे शरद पवार म्हणाले. इतरांचे जे आरक्षण आहे त्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असंही पवार म्हणाले. दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टिका केली. त्यांना एकही जागा निवडूण आणता आली नाही. ते लोक माझ्यावर बोलतात, हे प्रसिद्धीसाठी बोलत असतात असं म्हणत शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola