Zero Hour Guest Center Murlidhar Mohol : पुणे शहर कोणामुळे पाण्यात गेलं? मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?

Continues below advertisement

Zero Hour Guest Center Murlidhar Mohol : पुणे शहर कोणामुळे पाण्यात गेलं? मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?

 पुण्यात मुसळधार पावसामुळे (Pune Heavy Rain) अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. तर काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. आज सकाळी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधत मी सतत हवामान खातं आणि अधिकाऱ्यांसोबत बोलत आहे, अशी माहिती दिली. 

पुण्यात पुढेही पाऊस राहणार आहे. मी तातडीने पुण्याला जात आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट केलं आहे. एकता नगरमध्ये स्वत: आयुक्त पोहचले आहेत, असं अजित पवारांनी सांगितले. जमीन कोरडी असेल तर पाऊस पडल्यानंतर पाणी शोषून घेण्याची जमिनीची तयारी असते. आत्ता जमीन सगळी गेले दोन-तीन दिवसाच्या पावसामुळे ओली आहे. पुण्यात पेव्हर ब्लॉक आणि सिमेट काॅक्रीट रस्ते आहे. पुण्यात सकाळी धरणातून पाणी सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सगळीकडे पाऊस असल्याने नदी ओव्हरफ्लो झाली असल्याने सकल भागात पाणी साचलेले आहे, असं अजित पवारांनी सांगितले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram