Zero Hour Full Episode : पुणे अपघात प्रकरणावरुन नेते मंडळी भिडले | Pune Car Accident
Zero Hour Full Episode : पुणे अपघात प्रकरणावरुन नेते मंडळी भिडले | Pune Car Accident
अकरा दिवसांपासून हे प्रकरण राज्यात गाजतंय.. अकरा दिवसांमध्ये अकरा अध्याय पूर्ण झालेत.. मात्र दोन निष्पाप जीवांना न्याय काही मिळालेला नाहीय.. खरंतर, अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधियाचा मृत्यू अठरा मे रोजी एकदाच झाला.. आपल्या व्यवस्थेनं त्यांना वारंवार मारलंय..
जसं की इतक्या गंभीर दुर्घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन कारचालकाला अवघ्या १२ तासात जामीन दिला.. तेव्हा अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधियाचा दुसऱ्यांदा मृत्यू झाला..
अल्पवयीन कार चालकाच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण तपासण्याची जबाबदारी असलेल्या ससूनचे डॉ. अजय तावरे, डॉ. हळनोर यांनी काही लाखांसाठी त्या कारचालकाचे ब्लड सॅम्पल्सच बदलले... आणि तपासाची दिशा बदलली.. तेव्हा अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधियाचा तिसऱ्यांदा मृत्यू झाला..
आणि आता तर प्रकरणात आलेलं राजकारण... राजकारणात ताकत किती असते हे हि या प्रकरणात दिसून गेले ... कारण इथे विरोधकांनी मुद्दा लावून धरला ...आणि कारवाईला वेग आला हे नाकारता येत नाही ... त्याला जोड मिळाली ती सर्वसामान्य नागरिकांच्या रेट्याची ... आणि त्यामुळेच हे प्रकरण दडपता आले नाही हे हि तेवढेच खरे.
पण दुसरीकडे जर राजकीय नेत्यांच्या हाती प्रकरणातील कुठलीही माहिती असेल तर ती राखून ठेवण्यात काय अर्थ? निव्वळ सस्पेन्स तयार करून एवढ्या गंभीर प्रकरणात काय साध्य होणार हा सवाल हि विचारावासा वाटतो. माहिती लवकरात लवकर तपास यंत्रणा किंवा पब्लिक डोमेनमध्ये आणली पाहिजे. एखाद्या राजकीय नेत्याचे जर या केसमधील आरोपींशी लागेबांधे असतील, तर ते आरोप कशावर आधारित आहेत किंवा त्यासंबंधांचे पुरावे नक्की काय हे हि जनतेला लवकरात लवकर सांगितले पाहिजे. नाहीतर जे होत राहील ...ते न्याय मिळवून देण्याऐवजी राजकारणामधेच अडकून राहील.
झीरो अवर मध्ये आता वेळ झालीय एका ब्रेकची ... मात्र ब्रेकमध्ये कुठे हि जाऊ नका .. कारण ब्रेकनंतर बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका रखडल्या आणि परिणाम होणार तो विधान परिषदेवर...