Zero Hour Full Episode : भुजबळांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीत खळबळ?

Continues below advertisement

Zero Hour Full Episode : भुजबळांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीत खळबळ?


नमस्कार मी विशाल पाटील, झीरो अवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रासाठी लोकसभा निवडणूक संपली असली.. तरी आगामी विधान परिषद, महापालिका आणि विधानसभा निवडणुकीचं धूमशान राज्यात पुढील वर्षभर सुरूच असणार आहे.. त्यामुळे वेगवान राजकीय घडामोडी घडतायत.. त्यात कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी महायुतीत असलेल्या मनसेकडून, उद्या अभिजीत पानसे अर्ज भरणार आहेत.. पण भाजपकडून अद्याप उमेदवारीबाबत निर्णय झालेला नाही.. तर महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाच्या रडारवर आले आहेत.. तिकडे काँग्रेसने ४ जून रोजी इंडी आघाडीलाच बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय.. शिवाय पंतप्रधान कोण असणार? याबाबतही वक्तव्य केलंय.. तर एनडीएचा घटकपक्ष असलेल्या जेडीएसचा उमेदवार प्रज्ज्वल रेवण्णा.. ज्याच्यावर महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणाचे आरोप झालेत.. त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.. या सर्व बातम्यांचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोतच.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram