Zero Hour Full Episode : हनी ट्रॅप, नैतिकतेची गॅप, राजकारणी, अधिकारी घसरतात कसे?

Zero Hour Full Episode : हनी ट्रॅप, नैतिकतेची गॅप, राजकारणी, अधिकारी घसरतात कसे?

राज्यातील तब्बल 72 वरिष्ठ सरकारी आणि अधिकारी हनी ट्रॅपच्या (Honey Trap) जाळ्यात अडकल्याची खळबळजनक माहिती नुकतीच समोर आली होती. या अधिकारी आणि माजी मंत्र्यांची नावे सरकारकडून गोपनीय ठेवण्यात आली आहेत. हा तपासही गोपनीय पद्धतीने सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

या माहितीनुसार, राज्यातील सात क्लास वन प्रशासकीय अधिकारी, सनदी अधिकारी आणि आजी-माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील ठाणे गुन्हे शाखेकडे एकूण तीन तक्रारी आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. या तीनही तक्रारींची गोपनीय चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे. नाशिकमधील एक वरिष्ठ अधिकारी, नवी मुंबईतील एक व्यक्ती आणि ठाण्यातील एका बड्या व्यक्तीने या तक्रारी केल्याचे समजते. 

या तिन्ही तक्रारींमध्ये गंभीर स्वरुपांचे आरोप असून उच्चस्तरीय गोपनीय चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास करताना  ओळख सार्वजनिक करु नये, असे तक्रारदारांचे मत असल्याने अधिकाऱ्यांची नावे गोपनीय ठेवून अशा प्रकरणाचा तपास केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे गुन्हे शाखेकडे तीन तक्रारी प्राप्त झाल्या असल्या तरी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola