Zero Hour : रत्नागिरीतील देऊडमधील कातळशिल्पाला अखेर संरक्षित स्मारक म्हणून घोषित
Zero Hour : रत्नागिरीतील देऊडमधील कातळशिल्पाला अखेर संरक्षित स्मारक म्हणून घोषित
रत्नागिरीतील देऊडमधील कातळशिल्पाला अखेर संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलंय.. राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने तशी अधिसूचना जारी केली आहे. रत्नागिरीसह राजापूर तालुक्यात अश्मयुगीन कातळशिल्प आहेत. या परिसराचं व्यवस्थापन आणि विकास करण्यावर पुरातत्व विभागाचा भर आहे. कातळशिल्प परिसरातील तीनशे दहा चौरस मीटर क्षेत्रफळ जागा संरक्षित कऱण्यात आली आहे.. या कातळावर एकशिंगी गेंडा, गाढव, वानर, हरिण आणि पावलांच्या ठशांची चित्र रेखाटण्यात आली आहेत. निसर्गरम्य कोकणात जाण्यासाटी पर्यटकांकरिता हे नवे आकर्षण ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे..
या बातमी सोबतच झीरो अवरमध्ये आज इथेच थांबुयात.. उद्या संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी पुन्हा भेटुयात..पाहात राहा एबीपी माझा..