Zero Hour : एकनाथ शिंदे दरे गावात, सत्तेवरुन महायुतीत नाराजी नाट्य? शपथविधी लांबला

Continues below advertisement

Zero Hour  : एकनाथ शिंदे दरे गावात, सत्तेवरुन महायुतीत नाराजी नाट्य? शपथविधी लांबला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ज्या नेत्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही, ते नेते बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले. सर्वच पक्षीय नेत्यांनी केलेली बंडखोरी सर्वांसाठीच डोकेदुखी ठरली होती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर नाशिकातील भाजपमध्ये बंडखोर विरुद्ध निष्ठावंत असा संघर्ष सुरु झालाय. भाजपच्या सत्कार मेळाव्यात बंडखोरांना पक्षात घेऊ नये, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. भाजपच्या आमदारांसह शहराध्यक्षांची बंडखोरांना पक्षात न घेण्याची भूमिका अनेक स्थानिक नेते मांडताना दिसत आहेत. 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठावान विरुद्ध बंडखोर संघर्ष 

भाजपच्या सत्कार मेळाव्यात बंडखोरांविरुद्ध बोलताना शहरातील भाजपच्या तीनही नवनिर्वाचित आमदारांनी  खंत व्यक्त केली आहे. नाशिक भाजपमध्ये येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठावान विरुद्ध बंडखोर हा वाद सुरू झालाय. विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशामुळे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram