Zero Hour MLC Elections : ना दादांचे आमदार फुटले - ना शिंदेंचे; मविआचं गणित कुठे बिघडलं? ABP Majha
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीची (Vidhan Parishad Election) हाती आले आहेत. या निवडणुकीत महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवारी निवडून आले आहेत. शिवाय, महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. कारण काँग्रेसची 8 मतं फुटली आहेत. या मतांची फायदा महायुतीला झालाय. तर मविआचे उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, काँग्रेसची मतं फुटल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) चांगलेच संतापले आहेत. मुंबईत एबीपी माझाशी बोलताना फुटलेल्या मतांबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पृथ्वीराज चव्हाण काय काय म्हणाले?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आम्ही जी रणनीती ठरवली होती त्यानुसार आमचे तीन उमेदवार निवडून यायला हवे होते, पण आम्ही आकडेवारी पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आले की काँग्रेसची मतं ही निश्चित फुटली आहेत. ज्यांनी मत महाविकास आघाडीला दिली नाही, अशा काँग्रेस आमदारांची नावे आम्ही हाय कमांडला पाठवली आहेत. या आमदारांवर लवकरच हाय कमांडकडून कारवाई केली जाईल. अपक्षांचा उपयोग महाविकास आघाडीला झाला नाही यासंदर्भात मी कोणती कमेंट करणार नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केलं.