Zero Hour : धनंजय मुंडे गोत्यात? अजितदादांकडे विरोधकांची राजीनाम्याची मागणी

Continues below advertisement

Zero Hour : धनंजय मुंडे गोत्यात? अजितदादांकडे विरोधकांची राजीनाम्याची मागणी


बीड म्हटलं की तुमच्या डोळ्यांसमोर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची प्रतिमा तरळली असेल. त्यांचं ९ डिसेंबरला अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.. त्या घटनेला आज २९ दिवस पूर्ण होतायत.. पण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरु झालेलं आरोप प्रत्यारोपाचं राजकारण संपता संपत नाहीय...

त्याचवेळी मराठा विरुद्ध ओबीसी असाही संघर्ष उभा ठाकलाय. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी अशी मागणी करत मनोज जरांगेंनी मोर्चांचं आयोजनं सुरु केलंय.. बीड आणि परभणीनंतर हे मोर्चे पुण्यातही पार पडले.. बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली. इतकंच नाही तर सरपंच संतोष देशमुखांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत..

या प्रकरणात स्थानिक पोलीसांसह एसआयटीनंही आरोपींना बेड्या ठोकायला सुरुवात केली.. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या अटकेसाठी विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं... त्याच वाल्मिक कराडनं पुण्यात आत्मसमर्पण केलं.. आणि प्रकरणात नवा ट्विस्ट आला..

हाच वाल्मिक कराड राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळं धनंजय मुंडेंकडून मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी सुरु झाली... भाजपचे बीडमधल्या आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी मुंडेविरोधातील आरोपांचा मोर्चा सांभाळला होता.. आजही आझाद मैदानात पार पडलेल्या सरपंच परिषदेत सुरेश धस यांनी नाव न घेता.. धनंजय मुंडेवरच आरोप केले..

खासदार संजय राऊत आणि संभाजीराजे छत्रपती यांनी मात्र, अजित पवार आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.. त्यांच्यासोबतीलाच खासदार सुप्रिया सुळेंनी संतोष देशमुख प्रकरणात कोणत्याही राजकारणाशिवाय तपास व्हावा असं म्हणत नैतिकतेच्या आधारेच राजकीय नेत्यांनी भूमिका घ्याव्यात असं म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram