Zero Hour Badlapur Case : बदलापूरच्या शाळेत नेमकं काय घडलं? वाचा फोडणाऱ्या संगीता चेंदवणकर Exclusive

Zero Hour Badlapur Case : बदलापूरच्या शाळेत नेमकं काय घडलं? वाचा फोडणाऱ्या संगीता चेंदवणकर Exclusive

Badlapur Case : बदलापूर पूर्व मधील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानं आज अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. या अत्याचाराविरोधात बदलापूरकरांनी आंदोलनाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. सकाळी 6.30 वाजल्यापासून शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ सुरू झालेल्या आंदोलनाने संपूर्ण शहरभरात पेट घेतला. आरोपींना फाशीची मागणी आंदोलकांनी केली आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीमधूनही या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने (Shivali Parab) ही फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे. 

बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पालकांचा उद्रेक झाला आहे. संतापलेल्या पालकांनी आज शाळेबाहेर जोरदार आंदोलन केले. त्यानंतर आंदोलकांच्या संतप्त जमावाने  बदलापूर रेल्वे ट्रॅकवर जात रेल रोको आंदोलन केले. आंदोलनाची धग तीव्र होत गेल्याने प्रशासनही खडबडून जागे झाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola