Zero Hour : दादांचे आमदार काकांच्या वाटेवर ? राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतली जयंत पाटलांची भेट ?
ब्रेकनंतर झीरो अवरमध्य़े आपलं पुन्हा स्वागत.. लोकसभा निकालानंतर महायुतीत धुसफुस सुरुच आहे. पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीवर आक्षेप घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, विनाकारण युतीत वाद नको म्हणून अजित पवार यांनी स्वत: या प्रकाराची सविस्तर माहिती घेतल्याचं समजतंय. तिकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार घरवापसीच्या मार्गावर असल्याची चर्चा रंगली. विधानभवनात राष्ट्रवादीच्या पाच ते सहा आमदारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली... हे आमदार पश्चिम महाराष्ट्रातील असल्याचं सांगण्यात येतंय. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे... यावर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिलीय ती पाहुयात..