Zero Hour ABP Majha : जुनी पेन्शन योजना ते महाराष्ट्र भाजपचा मेगाप्लॅन; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

Continues below advertisement

Zero Hour ABP Majha : जुनी पेन्शन योजना ते महाराष्ट्र भाजपचा मेगाप्लॅन; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा एखाद्या व्यक्तीला ‘सरकारी नोकरी मिळाली की आयुष्य सेट होऊन जाईल,’ असं म्हणताना आपण नक्कीच ऐकलं असेल.. एक काळ असाही होता कि मुलाला सरकारी नोकरी म्हटली की लग्नाला मुलगी, मुलीच्या घरचे तात्काळ हो म्हणायची.. त्याला कारणही तसंच आहे.. खासगी कंपन्यांमधली नोकरी ही आव्हानात्मक असते.. तर सरकारी नोकरी ही तुलनेने सुरक्षित मानली जाते.. प्रतिष्ठा, भरपूर वेतनमान आणि निवृत्तीनंतर पेन्शनमुळे सरकारी नोकरीला आजही पसंती आहे..
पण सध्या याच पेन्शनवरून सरकार आणि सरकारी कर्मचारी पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकले होते... हिवाळी अधिवेशनात भव्य मोर्चा काढल्यानंतर.. आज राज्यातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीमधील जवळपास १७ लाख कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचं हत्यार उपसलं.. मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूरसह राज्यभरात त्याचे पडसाद उमटलेे.. शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामबंदमुळे सरकारही हललं.. आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत जुनी पेन्शन अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत देण्याबाबत, निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली... आणि शंभरहून अधिक आंदोलक संघटनांनी तात्काळ ऑनलाईन बैठक घेतली.. मुख्यमंत्र्यांचं निवेदन, तसंच पेन्शनचा मुद्दा सोडवण्याचे लिखित आदेश आल्यानंतर.. या शासकीय कर्मचाऱ्यांनी आज संध्याकाळी पावणे सात वाजता आपलं कामबंद आंदोलन स्थगित केलं.. आणि सर्वांनीच सुटकेचा दीर्घ श्वास घेतला.. हे आंदोलन स्थगित झाल्यामुळे रुग्णांचे होणारे हाल थांबले ही महत्त्वाची बाब... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram