Manoj Jarange | मुंबईत धडकणार Manoj Jarange, सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

मनोज जरांगे यांनी सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास गणेश चतुर्थीच्या सकाळी अंतर्वालीहून मुंबईकडे दोन दिवसांचा प्रवास सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा कुणबी एकच असल्याचा जीआर काढणे आणि कुणब्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देणाऱ्या अधिसूचनेची अंमलबजावणी करणे या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबईतून माघारी फिरणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर धडकण्याची तयारी पूर्ण झाली आहे. "आम्ही मुंबईत येणार आहे, शांततेत येणार आहे. कुणाला दुःख व्हायचं इच्छा नाही, आमच्या इच्छा नाही पण आरक्षण मी घेणार आता सोडणार नाही," असे जरांगे म्हणाले. त्यांच्या भाषेवरून भाजप नेत्यांनी टीका केली, ज्यावर जरांगेंनी स्पष्टीकरण दिले. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही जरांगेंवर टीका केली. वाशी येथे दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप जरांगेंनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काम करू दिले नाही, असा दावाही त्यांनी केला. मुंबईत मोठ्या संख्येने मराठे येतील, असे जरांगेंनी म्हटले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola