Zeeshan Siddique : झिशान सिद्दीकी यांच्या जागी अखिलेश यादव मुंबई बूथ युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी

Continues below advertisement

Zeeshan Siddique : झिशान सिद्दीकी यांच्या जागी  अखिलेश यादव मुंबई बूथ युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी मुंबईतल्या वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे माजी आमदार बाबा सिद्दिकी यांचे पुत्र आणि वांद्रे पूर्व मतदारसंघाचे विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी हे काँग्रेसचा हात सोडून अजित पवारांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतेच दाखल झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ झिशान सिद्दिकीही पक्षांतर करण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं काँग्रेसकडून हा निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी झिशान सिद्दिकी यांच्याऐवजी अखिलेश यादव यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. दरम्यान, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवल्याप्रकरणी झिशान सिद्दिकींनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मताधिक्यानं निवडून आलेल्या व्यक्तीला तडकाफडकी पदावरुन काढून टाकणं योग्य आहे का, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram