Yuvraj Singh: युवराज आणि हेझलला पुत्ररत्नाचा लाभ ABP Majha
भारताचा माजी अष्टपैलू युवराजसिंग आणि त्याची पत्नी हेझल कीच यांच्या आयुष्यात एक नवा पाहुणा आला आहे. हेझलनं काल रात्री एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर युवराजनं सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. आमच्या चाहत्यांना, हितचिंतकांना आणि मित्रपरिवाराला कळवण्यास आनंद होतो की, देवानं आम्हाला अपत्यरुपानं मोठा आशीर्वाद दिला आहे. देवाचे आभार मानून आम्ही आमच्या मुलाचं या जगात स्वागत करतो, असं युवराजनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.