Champions Trophy Final: 'चक दे फटे, जाओ और छा जाओ', Team India ला युवराज सिंहचा सल्ला
Continues below advertisement
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy 2025) च्या अंतिम सामन्यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहने (Yuvraj Singh) टीम इंडियाला खास संदेश दिला आहे. 'चक दे फटे... फक्त एवढंच सांगेन. फक्त मैदानावर जा आणि तुमचा सर्वोत्तम खेळ खेळा आणि त्या क्षणाचा आनंद घ्या,' असा भावनिक सल्ला युवराजने खेळाडूंना दिला आहे. अंतिम सामना खेळण्याची संधी फार कमी लोकांना मिळते आणि तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला ही संधी मिळत आहे, असेही तो म्हणाला. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे, त्यामुळे मैदानात जाऊन आपले वर्चस्व गाजवा, अशा शब्दांत युवराजने टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढवला आहे. त्याचा हा संदेश सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून चाहतेही टीम इंडियाला शुभेच्छा देत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement