Yugendra Pawar : महाराष्ट्रात संशयाचं वातावरण म्हणून पडताळणीसाठी अर्ज- युगेंद्र पवार

Continues below advertisement

Yugendra Pawar : महाराष्ट्रात संशयाचं वातावरण म्हणून पडताळणीसाठी अर्ज- युगेंद्र पवार

 नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आघाडीने मोठ्या प्रमाणावर जागा जिंकल्या. त्यानंतर अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी ईव्हीएम मशीनवरती शंका उपस्थित केल्या आहेत. तर काही उमेदवारांनी मत पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघात पवार विरूध्द पवार लढतीत अजित पवारांचा विक्रमी मतांनी विजय झाला तर युगेंद्र पवारांचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर आता युगेंद्र पवारांनी मत पडताळणीसाठी अर्ज केला आहे.

बारामती मतदारसंघातील महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी मत पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे. अजित पवार यांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार हे उमेदवार म्हणून निवडणूक लढले होते. 
त्यामध्ये त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी मत पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे. पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. पुण्यातील 11 उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 8 व काँग्रेसच्या 3 उमेदवारांचा समावेश आहे.

लोकसभेप्रमाणे राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी आणि पवार विरूध्द पवार अशी लढत झाली. या बारामती मतदारसंघारडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी पुन्हा एकदा विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. अजित पवारांना 1,96,640 तर युगेंद्र पवारांना 80,458 इतकी मते मिळाली आहेत. अजित पवार 1,16,182 मतांनी विजयी झाले आहेत. अजित पवारांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पडलेली तशीच रेकॉर्डब्रेक मते मिळाली आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram