Yugendra Pawar Baramati: पवार साहेब माझे गुरू; मी नेहमी बारामतीकरांसाठी काम करत राहीन
Yugendra Pawar Baramati: पवार साहेब माझे गुरू; मी नेहमी बारामतीकरांसाठी काम करत राहीन
पवार साहेब, सुप्रिया सुळे, माझे आई वडील, कार्यकर्ते यांचे आभार मानतो आज माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द राहिलेले नाहीत (काहीसे भावूक). ते नेहमी मार्गदर्शक, गुरू राहिले आहेत. आपण लहान असताना रोल मॉडेल, आदर्श म्हणून बघत असतो, माझ्यासाठी नेहमी पवार साहेब माझ्यासाठी रोल मॉडेल हा क्षण माझ्या आयुष्यातील मोठा दिवस आहे मी नेहमी बारामती कर यांच्यासाठी काम करत राहील त्यांचे विचार घेऊन मी दिवस रात्र जोपर्यंत माझ्यासाठी शक्य आहे बारामती कर यांचे काम करत राहील ज्या पद्धतीने बारामतीकर यांनी ५५ वर्ष शरद पवारांना आशीर्वाद दिला तसा आशीर्वाद मला द्या एक लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्यात असेल पवार साहेब फार मोजके बोलतात ते सल्ले आणि कानमंत्र देत नाहीत पण ते जे सांगतात त्याचं आपण ऐकलं पाहिजे आव्हान असेल का नसेल त्यावर मी आज विचार केला नाही. माझ्यासमोर इथले मोठे उमेदवार असतील तरी माझ्या सोबत पवार साहेब आहेत मी उमेदवार, काका असं मी समोर बघत नाही मला फक्त पवार साहेबाना साथ द्यायची आहे मी ४ वेळा बारामती पिंजून काढली आहे दादा बदलायचा आहे का नाही? मला बदलण्याची भाषा करणं योग्य वाटत नाही माझ्या जवळचे जे आहेत त्यांच्यासाठी मी शरद पवारांकडे जाणं आश्चर्यकारक नव्हतं