Yugendra Pawar Baramati Speech : शरद पवारांच्या उपस्थित युगेंद्र पवारांचं बारामतीत स्फोटक भाषण
Yugendra Pawar Baramati Speech : शरद पवारांच्या उपस्थित युगेंद्र पवारांचं बारामतीत स्फोटक भाषण
झ्य़ावर विश्वास ठेवलाय.. मी प्रमाणिकपणे काम करेन मी अजित पवरांचं पुर्ण भाषण एकलं नाही मी त्यांच्या पेक्षा वयाने लहान आहे.. मी त्यांच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही कुटुंब फोडण्याचा प्रयत्न असं मला वाटत नाही भाजपचे विचार आमच्या कुटुंबाला कधी पटले नाहीत याच विचारांसोबत आम्ही आहोत मी आजीला कधी राजकारणात आणलं नाही.. मला ते जपायचं आहे मला राजकारण करायचं नाही 57 वर्षानंतर शरद पवार साहेब अर्ज भरण्यासाठी आले..
हे ही वाचा...
अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवाब मलिक यांना एबी फॉर्म दिला असल्याची माहिती समोर आली आहे. नवाब मलिक यांच्यावर दाऊदच्या हस्तकाशी आर्थिक व्यवहार केल्याचे आरोप आहेत. त्यामुळे नवाब मलिक (Nawab Malik) यांना सोबत घेण्यास आणि आता विधानसभेला त्यांना उमेदवारी देण्यास भाजपचा स्पष्ट विरोध होता. त्यामुळे अजित पवार गटाकडून अद्याप नवाब मलिक यांच्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र, नवाब मलिक यांना अजित पवार गटाने (Ajit Pawar Camp) एबी फॉर्म देऊन ठेवल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हा एबी फॉर्म उमेदवारी अर्जाला जोडण्याबाबत नवाब मलिक यांना अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतरच नवाब मलिक हे आपल्या उमेदवारी अर्जाला एबी फॉर्म जोडतील. अन्यथा मुंबईतील शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्यावर नवाब मलिक ठाम आहेत. विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे थोड्याचवेळात नवाब मलिक हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असतील की नाही, हे स्पष्ट होईल.