Kolhapur Bisen Attack : गव्याच्या हल्ल्यात कोल्हापूरच्या भुयेवाडीतील तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोल्हापूर शहराच्या उपनगर आणि पंचगंगा नदीच्या काठी वावरणारा गवा भुयेवाडीच्या दिशेने गेला होता. भुयेवाडी येथील एका उसाच्या शेतात गवा असताना काही तरुण त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत होते. अशावेळी गव्याने मागे फिरून हल्ला केला. या हल्ल्यात सौरभ संभाजी खोत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर प्रल्हाद पाटील आणि शुभम पाटील हे दोघेजण जखमी झाले आहेत.