'पार्थ, तुम्ही जन्मत: फायटर', पद्मसिंह पाटील यांच्या नातवाची पार्थ यांच्या समर्थनार्थ पोस्ट

Continues below advertisement
"पार्थ पवार यांचं वक्तव्य इमॅच्युर असून त्यांच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही ", अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारल्यानंतर, आता पार्थ पवार यांना आजोळातून समर्थन मिळालं आहे. पार्थ तुम्ही जन्मत: फायटर आहात, अशी पोस्ट नुकतेच भाजपवासी झालेले पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यांनी फेसबुकवर केली आहे.

पार्थ पवार यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार या पद्मसिंह पाटील यांच्या बहिण आहेत. अजित पवार आणि डॉ. पद्मसिंह पाटील हे नात्याने मेव्हणे आहेत. मल्हार पाटील हे तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजित सिंह यांचे चिरंजीव आहेत.उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे पार्थ पवार यांचे आजोळ आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram