Yogi Aadityanath In Mumbai : योगी आदित्यनाथ यांना मुंबईतून एकाच दिवसात कोट्यावधींची गुंतवणूक मिळाली

Continues below advertisement

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज मुंबई दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी हिंदी चित्रपटसृष्टीतील बडे अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. योगी आदित्यनाथ यांनी काल अभिनेता अक्षय कुमारचीही भेट घेतली होती.मुंबईतल्या गोरेगावसारखीच एक फिल्मसिटी म्हणजेच प्रतिबॉलिवूड उत्तर प्रदेशातल्या नोएडामध्ये तयार करण्याचा निर्णय योगींनी घेतला होता. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. त्यानंतर आता उत्तर प्रदेशात वेब सीरिजचं चित्रीकरण केलं तर त्यासाठी ५० टक्के अनुदान देण्याचा विचार असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय. आझमगढमध्ये संगीत महाविद्यालय सुरु करण्याबाबतही चर्चा सुरु असल्याची माहिती योगींनी या बैठकीत दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram