Yogesh Thombre CA | भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha

Continues below advertisement

Yogesh Thombre CA | भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha

भाजी विक्रेता महिलेचा मुलगा झाला सी ए  पुण्यातील आय ए एस अधिकारी पूजा खेडकर हिच्या आईचा प्रताप अवघ्या महाराष्ट्राने पहिलाय  तर दुसरीकडे मुंबई जवळ असलेल्या डोंबिवलीतील  एका भाजी विक्री करणाऱ्या आईने आपल्या मुलाला  सी ए बनवल्यामुळे नागरिक आईवर आनंदाचा वर्षाव करत असल्याचे समोर आले आहे   भाजी विक्रेता महिलेचा मुलगा झाला सी ए  राज्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ट्विट करत केले कौतुक  Anchor :- डोंबिवली मध्ये एका भाजी विक्रेता महिलेचा मुलगा सीए झाला सीए झाल्यावर या मुलांना त्याच्या आईला मारलेली मिठी आणि त्या माऊलीच्या डोळ्यातून निघालेले आनंदाश्रू या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल झाला .हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर योगेशवर अभिनंदनचा वर्षाव होत असून ज्या ठिकाणी योगेश ची आई भाजी विकते त्या ठिकाणी सुद्धा त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आणि या व्हिडिओवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली      जिद्द ,कष्ट आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत या सगळ्या गोष्टीमुळे योगेश न सुद्धा आपल्या आईच्या कष्टाचं चीज केल आहे. सोमवारी योगेश न सीए झाल्यावर पहिली भेट म्हणून आपल्या आईला साडी गिफ्ट केली आहे. हे सर्व दृश्य पाहून आजूबाजूच्या नागरिकांचे सुद्धा डोळे पाणावले  योगेश ठोंबरे हा डोंबिवली जवळील खोनी गावांमध्ये राहतो. योगेश ची आई निरा ठोंबरे या डोंबिवलीतील गांधीनगर परिसरात भाजीचा व्यवसाय करतात  गेल्या 22 ते 25 वर्षांपासून त्या याच ठिकाणी भाजी विकत आहेत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे सुद्धा नव्हते  त्यावेळेला दोनशे रुपये उसने घेऊन त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. त्यांच्या कष्टाच चीज आज योगेशने केले. योगेश सी ए ची परीक्षा पास झाला हे ऐकल्यावर निरा यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. बेताची परिस्थिती असताना सुद्धा नीरा  यांनी हिमतीने घर, संसार सांभाळत हा व्यवसाय केला. त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा हार मानली नाही. सीए बनायचं असं मनात ठरलं होतं. त्यानुसार नियोजन करूनअभ्यास केला. मी रिझल्ट ची वाट बघत होतो मात्र रिझल्ट समोर आला आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. ही गोड बातमी घेऊन मी आईला सांगायला गेलो तेव्हा आई नेहमीप्रमाणे भाजी विकत होती आईला मिठी मारली आणि हा सर्व क्षण मित्रांनी मोबाईल मध्ये कैद केला  हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे याची कल्पना मला नव्हती. मात्र फोन सुरू झाले. अनेक मोठ्या नेत्यांनी ट्विट केलं .त्यानंतर मला समजलं अशा भावना योगेशने व्यक्त केल्या आहेत. मराठी माध्यमातून शिकलेला आगरी समाजातला एक मुलगा इंग्रजीची भीती न बाळगता आज सीए झाला. योगेशने आणि त्याच्या आईने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला असून अनेक जुने ग्राहक सुद्धा त्यांच्या मैत्रिणी ओळखीतले त्यांना शोधत आज त्यांच्या भाजीच्या दुकानात येऊन त्यांचं अभिनंदन करताना दिसत  स्थानिक नागरिक ठोंबरे मावशिकडून भाजी विकत घेतात आणि मुलगा सी ए झाल्याच्या शुभेच्छा देतात या शुभेच्छामुळे ठोंबरे मावशीच्या डोळ्यात पाणी तरळले  कोणी पैसे देऊन शुभेच्छा देतात तर कोणी चॉकलेट पतीचे निधन झाल्यावर घरातील नातेवाईकांनी घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नीरा ठोंबरे यांनी जिद्द सोडली नाही पदरी दोन मुलं आणि एक मुलगी यांचे पालन पोषण करून मुलांचे भविष्य निर्माण करण्याचा विडा उचलून तीन मुलासोबत मोठ्या जिद्दीने उभे राहून 25 वर्षे भाजी विक्रीचा व्यवसाय करून मोठ्या मुलाचे आणि मुलीचे लग्न करून दिले  हे करूनही या ठोंबरे मावशी थांबल्या नाहीत त्याचा लहान असलेला मुलगा योगेश याला सी ए बनवले आहे ठोंबरे मावशीचा संघर्ष भाजी मंडई मध्ये खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांनी जवळून पाहिल्याने मावशीवर शुभेच्छांचा वर्षाव करत चॉकलेट आणि गिफ्ट देऊन सन्मान केलाय

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram