Satara : शिखर Shinganapur यात्रेचा काल आणि आज महत्त्वाचा दिवस, ड्रोन कॅमेऱ्यातून टिपले विहंगम दृश्य
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर यात्रेचा काल आणि आज महत्त्वाचा दिवस आहेत. या यात्रेत ५ लाखांवर भाविक हजेरी लावतात. अवाढव्य कावडी हे या यात्रेचं वैशिष्ट्य. यावर्षी निर्बंधमुक्तीमुळे या यात्रेत उत्साह दिसतोय. कावडी मंदिरापर्यंत आणण्याचा थरार पाहण्याजोगा असतो. या यात्रेचं ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेलं विहंगम दृश्य खास माझावर आपण पाहू शकता. मुंगी घाटातील खपारीतून मंदिराकडे जाणाऱ्या कावडींचा हा थरार आहे.....