Maharashtra Rain Alert : संपूर्ण मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी, 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
Continues below advertisement
राज्यात पुढील तीन दिवस सर्वत्र वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातसर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाचा क्षेत्रांमुळे पाऊस लांबला आहे. सप्टेंबर मध्यानंतर मान्सून प्रामुख्याने माघारी फिरत असतो मात्र यावर्षी सप्टेंबर अखेर उजाडणार असल्याने राज्यात चांगला पाऊसबघायला मिळू शकतो. देशाच्या पूर्व व मध्य भागात आजपासून पावसाचे प्रमाण वाढणार आहे. प्रामुख्याने मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळेल. दरम्यान, राज्यात देखील सर्वत्र पावसाचा अंदाज आहे.
Continues below advertisement