Yawatmal Washim Lok Sabha : यवतमाळ - वाशिमसाठी शिवसेनेचा उमेदवार अद्याप निश्चित नाही
Yawatmal Washim Lok Sabha : यवतमाळ - वाशिमसाठी शिवसेनेचा उमेदवार अद्याप निश्चित नाही
वतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून अद्याप उमेदवार निश्चित नाही.
या ठिकाणी सलग पाच वेळा निवडून आलेल्या भावना गवळी यांच्यासाठी भाजप अनुकूल नसल्याने नवीन उमेदवार शिंदेंना शोधावा लागत आहे. त्यामुळे बंजारा समाजाचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात संजय राठोड यांचे नाव पुढे करुन त्यांना उमेदवारी घेण्यासाठी समजूत काढली जात आहे. मात्र विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय राठोड हे लोकसभा लढवण्यास इच्छुक नाहीत. त्याऐवजी त्यांनी आपली पत्नी शितल संजय राठोड यांचा प्रस्ताव वरिष्ठ नेत्यांसमोर ठेवला आहे.