झाडात शिरलेल्या सापाला बाहेर काढण्यासाठी झाडालाच आग लावली; यवतमाळच्या कळंबमधला अजब प्रकार
यवतमाळ : वाळलेल्या कडू लिंबाच्या झाडाच्या पोकळीत साप शिरला म्हणून चक्क झाड पेटवल्याचा अजब प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे घडला आहे. कळंब येथे एक बिनविषारी साप कडूलिंबाच्या पोकळीत शिरला होता. एका नागरिकाने ही घटना बघितली. त्याने या सापाला बाहेर काढण्यासाठी चिंधीला आग लावून झाडाच्या पोकळीत टाकली. बघता बघता झाडाने पेट घेतला. हे झाड नागरी वस्तीत असल्याने नागरिकात घबराट पसरली. या वेळी फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आले. अनेक प्रयासाने ही आग विझविण्यात आली. पण सुदैवाने या सापाला कोणत्याच प्रकारची इजा झाली नाही. फायर ब्रिगेडच्या लोकांनी या सापाला वाचविले.