Yavatmal : स्वप्नांचा 'अपघात', शेख इस्माईलचं हेलिकॉप्टरच्या चाचणीदरम्यान अपघातात मृत्यू

Continues below advertisement

यवतमाळच्या फुलसावंगीतल्या शेख इस्माईलनं हेलिकॉप्टर निर्मितीचं ध्येय उराशी बाळगलं.. लवकरच त्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं जाणार होतं. मात्र क्रूर नियतीच्या मनात वेगळच काहीतरी होतं. स्वतःच तयार केलेल्या हेलिकॉप्टरची चाचणीदरम्यान बिघाड होऊन पंख्याचा फटका बसल्यानं इस्माईलच्या डोक्याला दुखापत झाली. उपचारासाठी पुसदला नेत असताना इस्माईलचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे मारुती 800 चं इंजिन वापरुन इस्माईलनं हेलिकॉप्टरची निर्मिती केली होती.. त्याचं शिक्षण फक्त नववीपर्यंत झालं होतं. वेल्डर म्हणून काम करणाऱ्या इस्माइलनं कल्पनाशक्तीच्या जोरावर हेलिकॉप्टर तयार केलं होतं.  म्हणून त्याला मुन्ना हेलिकॉप्टर नावानं ओळखलं जायचं...
 येत्या १५ ऑगस्टला तो हेलिकॉप्टरचं प्रात्याक्षिक करुन पेटंटच्या दिशेनं पाऊल टाकणार होता. मात्र त्यापूर्वी कालानं त्याच्यावर घाला घातला... दरम्यान या घटनेचा व्हीडिओ आता समोर आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram