Yavatmal Ragging : यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग झाल्याचा आरोप, 45 तास ठेवलं उभं
Yavatmal Ragging : यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग झाल्याचा आरोप करण्यात आलाय. पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला पाच विद्यार्थ्यांनी ड्युटीच्या नावाखाली सलग 45 तास उभं करून ठेवलं आणि त्यामुळे त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागली असा आरोप विद्यार्थ्यांच्या आईनं केलाय. तशी तक्रार तिने महाविद्यालयाच्या अधीष्ठातांकडे दिल्यानंतर त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत केलीय.