coronavirus | उस्मानाबाद, यवतमाळ जिल्ह्यात पानटपऱ्यांवर बंदी, खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाचा आदेश
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तंबाखुजन्य पदार्थ विकणाऱ्या सर्व पानटपऱ्यांवर बंदी घालण्यात आलीय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी आदेश दिलेत. पुढील आदेश येईपर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील पानटपऱ्या बंद असतील..तिकडे यवतमाळ जिल्ह्यातही प्रशासनाने सर्व पानटपऱ्यांवर बंदी घातली आहे.