Neelam Gorhe Doctor Suicide: डॉक्टर महिला दबावाला का बळी पडली? निलम गोऱ्हे म्हणाल्या ही शोकांतिका

Continues below advertisement
यवतमाळमधील शासकीय रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून (Yavatmal Doctor Suicide) विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी (Neelam Gorhe) व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'संवाद, दबाव, शरणागती, मैत्री आणि शेवटी ब्लॅकमेलिंगच्या भीतीतून शोषण, हा अत्याचाराचा एक क्रम आहे', असं सांगत नीलम गोरेंनी या प्रकरणातील भीषण वास्तव मांडले. पीडित डॉक्टरवर पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात पीएसआय गोपाल बदने (Gopal Badane) आणि प्रशांत बनकर (Prashant Bankar) या पोलीस कर्मचाऱ्यांवर बलात्काराचे आणि छळाचे आरोप आहेत. या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी गोरेंनी केली आहे. आरोपींना तपासापासून दूर ठेवावे आणि त्यांचे फोन रेकॉर्ड तपासावेत, असे निर्देश दिल्याचेही गोरेंनी सांगितले. सुसाईड नोटमध्ये बलात्काराचा उल्लेख असल्याने हा केवळ व्यावसायिक दबावाचा नाही, तर लैंगिक शोषणाचाही गंभीर प्रकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola