Yavatmal ST Bus Fire : 10 ते 12 अज्ञातांनी एसटी बस पेटवली, नागपूर-तुळजापूर हायवेवरील घटना

Continues below advertisement

Yavatmal Crime : 10 ते 12 अज्ञातांनी एसटी बस पेटवली, नागपूर-तुळजापूर हायवेवरील घटना
Maharashtra Yavatmal News: यवतमाळमध्ये (Yavatmal News) नागपूर तुळजापूर महामार्गावर अज्ञात 10 ते 12 अज्ञातांनी एसटी बस पेटवल्याची घटना घडली. बसमधील सर्व 73 प्रवासी सुरक्षित आहेत. विदर्भ-मराठवाडा सीमेवर उमरखेडजवळील पैनगंगा नदी पुलावर हा प्रकार घडला. ही बस हातगाववरुन नागपूरकडे जात होती. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बस पेटवणाऱ्या अज्ञातांचा शोध सुरू आहे.
नेमकं काय घडलं? 
नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील मार्लेगांव जवळ रात्री अज्ञात लोकांनी एसटी बस थांबवून पेटवून दिलीय, बस मध्ये असलेले सर्व 73 प्रवाशी सुरक्षित आहेत. मात्र लावलेल्या या आगीत एसटी बस पूर्णपणे जळून खाक झालीय. नांदेडच्या हदगांव आगाराची ही बस नागपूरकडे जात होती. त्याचवेळी मराठवाडा-विदर्भ सीमेवरच्या पैनगंगा नदीच्या पुलावर बस ला थांबवत अज्ञात लोकांनी आग लावलीय.या घटनेमागे मराठा आरक्षणाच्या आंदोलकांचा हाथ असावा अशी शक्यता वर्तवली जातेय, कारण विदर्भाच्या सीमेवर असलेल्या हदगांव तालुक्यात आरक्षण आंदोलन आधीपासूनच मोठया प्रमाणात सुरू आहे. दरम्यान, बस पेटवून देणारे नेमके कोण होते याचा पोलीस शोध घेत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram