Yavatmal : गाडीच्या Break Pedal मध्ये पाण्याची बाटली अडकल्यानं भीषण अपघात,तिघांचा मृत्यू दोन जण जखमी
Continues below advertisement
वाहन चालवताना केवळ वाहतुकीचे नियम पाळणं पुरेसं नसतं तर गाडीच्या आत चालकाला अडथळा येऊ नये याचीही काळजी घ्यावी लागते. तसं न झाल्यास जीवावर बेतू शकतं. यवतमाळच्या पुसदमध्ये अशीच एक घटना घडली आहे आणि या अपघातात तीन जणांना जीव गमवावा लागलाय. मध्यप्रदेशमधून एका चारचाकी गाडीमधून काही जण पुसद इथे लग्नासाठी स्थळ पाहायला येत होते. पुसद जवळच्या खंडाळा घाटात चालकाच्या पायाजवळ पाण्याची बाटली आली. या बाटलीमुळे गाडीचा ब्रेक लागू शकला नाही आणि चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं. आणि गाडी फरपटत एका मोठ्या झाडावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता. की त्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत.
Continues below advertisement