Yashomati Thakur On Ravi Raba : 'राणांच्या 'त्या' किटवरून यशोमती ठाकूर संतापल्या; दिला इशारा
Continues below advertisement
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पेटला आहे. राणा दाम्पत्याने दिवाळीनिमित्त वाटलेल्या किराणा मालाच्या किटवरून यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. 'माझ्या बापदादांनी कधी बारदाना चोरला नाही,' अशा शब्दात ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार टीका केली आहे. हे निकृष्ट दर्जाचे किराणा किट फोटो काढण्यासाठी माझ्या घरी पाठवण्यात आले, असा आरोप करत त्यांनी, 'मी प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे आणि प्रतिष्ठित घरात व्यक्तीची बायको आहे, मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही,' असे सुनावले. या प्रकाराची पुनरावृत्ती झाल्यास चांगले उत्तर मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे अमरावतीमधील राजकीय वातावरण तापले असून, 'लाडकी बहीण' योजनेवरूनही विरोधक सरकारवर टीका करत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement