Yashashri Shinde Uran Case : यशश्री शिंदेंचा मोबाईल सापडला,नवी मुंबई क्राईम ब्रँचकडून कसून तपास सुरू
Yashashri Shinde Uran Case : यशश्री शिंदेंचा मोबाईल सापडला,नवी मुंबई क्राईम ब्रँचकडून कसून तपास सुरू
येथील यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी हा पोलिस कोठडीत आहे. यशश्रीच्या हत्येनंतर तिचा मोबाइल गहाळ झाला होता. आता हा मोबाइल पोलिसांच्या हाती लागला असून, या प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर येणार आहेत. यशश्री हिच्या हत्येनंतर आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी कर्नाटक (गुलबर्गा) येथून अटक केली आहे. त्याच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला १३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पाच वर्षांपासून आमच्या दोघांमध्ये मोबाइलवरून संपर्क होता, अशी कबुली आरोपीने दिली आहे. मात्र, यशश्री हिचा मोबाइल गहाळ झाला होता. आता हा मोबाइल सापडला आहे. तपासणी व डाटा मिळविण्यासाठी यशश्रीचा मोबाइल लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहे. मंगळवारी आरोपीची पोलिस कस्टडी संपणार आहे. आरोपी तपासात सहकार्य करत असल्याचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. विशाल नेहूल यांनी सांगितले.