Yamini Jadhav - Ravindra Waikar : दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव, उत्तर पश्चिममधून वायकरांना उमेदवारी

Continues below advertisement

Yamini Jadhav - Ravindra Waikar : दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव, उत्तर पश्चिममधून वायकरांना उमेदवारी एकीकडे महायुतीचा नाशिकचा तिढा कायम असला तरी मुंबईचं गणित मात्र सुटलंय. 
महायुतीने आज मुंबईतून दोन जागांवर उमेदवारी जाहीर केली. मुंबई दक्षिणचा तिढा अखेर सुटलाय. मुंबई दक्षिण या मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेनेच्या यामिनी जाधव या लढवणार आहेत. पक्षाने आज संध्याकाळी याची अधिकृत घोषणा केली. त्याशिवाय मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून आज रवींद्र वायकरांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. दक्षिण मुंबईत आता अरविंद सावंत विरूद्ध यामिनी जाधव अशी तर उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर विरूद्ध रवींद्र वायकर अशी लढत होईल. आता केवळ उत्तर मुंबईचं चित्रं स्पष्ट झालेलं नाही. महाविकास आघाडीने अजून उत्तर मुंबईतून उमेदवारी जाहीर केलेली नाही. उत्तर मुंबईतून केंद्रीयमंत्री पियूष गोयल यांच्याशी दोन दोन हात कोण करणार हे अजून  स्पष्ट झालेलं नाही. महायुतीने अजूनही नाशिक, ठाणे, पालघर या तीन मतदारसंघात उमेदवारी जाहीर केलेली नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram