Supriya Sule On Punjab CM: सिकंदर शेखच्या अटकेवरून राजकारण तापलं, सुप्रिया सुळेंचा थेट पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फोन
Continues below advertisement
पहिलवान सिकंदर शेखच्या (Sikander Shaikh) अटकेमुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी थेट पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्याशी संपर्क साधला आहे. 'सिकंदर शेखच्या अटकेप्रकरणी आज दुपारपर्यंत योग्य माहितीसह उत्तर देण्याचा शब्द' पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सुप्रिया सुळे यांना दिला आहे. पंजाब पोलिसांनी (Punjab Police) सिकंदर शेखला शस्त्र तस्करीच्या आरोपाखाली अटक केली असून, त्याचे राजस्थानमधील फफला गुर्जर (Papla Gurjar gang) टोळीशी संबंध असल्याचा दावा केला आहे. या अटकेनंतर इतर पहिलवान आक्रमक झाले असून, ही कारवाई चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता मुख्यमंत्री भगवंत मान या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement