Navratri 2021 : वणीच्या सप्तश्रुंगी मंदिरात देवीच्या आभूषणांची पूजा, पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक
Continues below advertisement
Temple Reopen : राज्यात कोरोनाची घटती प्रकरणे पाहता सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. त्यानंतर आजपासून राज्यातील सर्व मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. या निमित्तानं मंदिरं सजवण्यात आली असून भाविकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी सर्व धार्मिक स्थळे उघडली गेली. मात्रं धार्मिक स्थळं उघडताना कोरोनाचे सर्व नियम पाळले जाणार आहेत.
साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध पीठ म्हणजे नाशिकच्या वणी डोंगरावर वसलेली सप्तश्रृंगी देवी. नवरात्रौत्सवानिमित्त भाविकांना आज थेट मंदिरात जाऊन सप्तश्रृंगीचं दर्शन घेता येणार आहे. दरम्यान आजच्या पुजेपूर्वी देवीच्या शृंगाराची मिरवणूक काढण्यात आली. हलगीच्या तालावर निघालेल्या या मिरवणुकीमुळं वणीचं वातावरण भक्तीमय झालं होतं.
Continues below advertisement
Tags :
Navratri Navratri Special Vani Saptashrungi Navratri 2021 Navaratri Navratri Video Navratri Bhajan Navratri Song 2021 Navratri Status 2021 Navaratri 2021