Solapur : सुट्टी मिळवण्यासाठी मजुराची शक्कल, बिबट्याने हल्ला केल्याचा बनाव, अफवेमुळे वनविभाग हैराण
कामावरुन सुट्टी मिळावी यासाठी तुम्ही आतापर्यंत वेगवेगळे बहाणे केल्याचे ऐकले असतील. सोलापुरात मात्र एका शेतमजुराने हद्दच केली. कामावरुन सुट्टी मिळावी यासाठी चक्क बिबट्याने हल्ला केल्याची अफवा या मजूराने पसरवली. काही वेळातच ही अफवा वाऱ्यासारखी पसरली. विशेष म्हणजे या अफवेला दुजोरा देण्यासाठी दुसऱ्या राज्यातील एक विडियो देखील वायरल केला जाऊ लागला. त्यामुळे परिसरात एकच भीतीचे वातावरण पसरले. या घटनेमुळे वनविभागाचे मात्र हाल झाले.