Prithviraj Chavan | निवडणुकीच्या काळात भाजप पदाधिकाऱ्याला निवडणूक आयोगाचं काम : पृथ्वीराज चव्हाण

निवडणुकीच्या काळात भाजप पदाधिकाऱ्याला निवडणूक आयोगाचं काम दिलं गेलं होतं, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की,सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात प्रचार करायला जी कंपनी होती. त्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला मी पत्र लिहिले आहे. ही कंपनी एक भाजप पदाधिकाऱ्याची आहे. तो भाजप युवा आयटी सेलचा प्रमुख आहे. त्याने निवडणूक आयागाचे सोशल मीडिया पेज चालवले, तोच पत्ता निवडणूक आयोग जाहिरात करताना वापरला, असल्याचा गंभीर आरोप चव्हाण यांनी केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola