Leopard Safety: जीव वाचवण्यासाठी महिलांच्या गळ्यात खिळ्यांचे पट्टे, शिरूरमधील धक्कादायक वास्तव
Continues below advertisement
पुणे (Pune) आणि नाशिक (Nashik) जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या संख्येने आणि हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. उत्तर पुणे जिल्हा बिबट्यांचा हॉटस्पॉट (Leopard Hotspot) बनला असून, शिरूर (Shirur) तालुक्यातील पिंपरखेड गावच्या महिलांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी गळ्यात टोकदार खिळे असलेले पट्टे घालण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, मोहोळ (Mohol) तालुक्यात एका राजकीय नेत्याने आपल्या विरोधकावर टीका करताना एक धक्कादायक विधान केले आहे. 'ज्या लोकनेत्याच्या मुलाला लपडी करण्याचा, मुली नासवण्याचा भरपूर अनुभव आहे आणि त्याच्या बापाला याचा अभिमान आहे', असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या वक्तव्यामुळे तालुक्यातील सुसंस्कृत पिढी घडवण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिकच्या निफाड (Niphad) तालुक्यातही बिबट्याने एका शेतकऱ्याच्या दोन पाळीव कुत्र्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement