Women's Safety: Samruddhi महामार्गावर महिलेची छेड, Helpline वर फोन करताच Police पेट्रोल पंपावर दाखल
Continues below advertisement
समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुण्याहून दिवाळीसाठी मध्यप्रदेशला जाणाऱ्या एका महिलेची बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील बिबी गावाजवळच्या पेट्रोल पंपावर छेड काढण्यात आली. 'रात्रीच्या वेळी पेट्रोल पंपावरील आकाश इंगळे नावाच्या कर्मचाऱ्याने फायदा घेऊन छेड काढली', असे पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे. यानंतर पीडित महिलेने तात्काळ पोलीस हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला, त्यानंतर बिबी पोलिसांनी (Bibi Police) घटनास्थळी धाव घेत आरोपी आकाश इंगळेला (Akash Ingale) ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील, विशेषतः रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement