Wolf Attack : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये लांडग्याची दहशत,24 ते 30 पेक्षा जास्त नागरिकांवर हल्ला
अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातील धारणी तालुक्यात सध्या रेबिज झालेल्या लांडग्यांची दहशत पाहायला मिळतेय. या लांडग्याने आत्तापर्यंत 24 ते 30 पेक्षा जास्त नागरिकांना चावा घेतलाय.. एका मृत लांडग्याचा अहवाल बंगळुरू येथील प्रयोगशाळेतून वनविभागाला प्राप्त झालाय.. यात रेबिजमुळे लांडगा चवताळल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. 15 दिवसांपूर्वी 27 जणांना चवताळलेल्या लांडग्याने चावा घेतला होता.. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी लांडग्याला ठार केलं होतं. त्यामुळे दहशत संपली असं नागरिकांना वाटत असतानाच दोन दिवसांपूर्वी धारणी आणि परिसरात पुन्हा दोन दिवस चवताळलेल्या लांडग्याने 8 पेक्षा अधिक जणांना चावा घेतलाय.