Chandrakan Khaire : Sandeepan Bhumre यांच्या शुभेच्छा न स्वीकारताच खैरेंचा कार्यक्रमातून काढता पाय
Continues below advertisement
शिंदे आणि ठाकरे गटातील वाद आता प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातही पाहायला मिळाला... औरंगाबादेत आज पालकमंत्री संदीपान भुमरेंच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला खासदार इम्तियाज जलील, शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट तसंच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यासह चंद्रकांत खैरे यांची देखील उपस्थिती होती. यावेळी, ध्वजवंदन झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या भुमरेंना चंद्रकांत खैरेंनी टाळल्याचं पाहायला मिळालं.... संदीपान भुमरेंच्या शुभेच्छा न स्वीकारताच चंद्रकांत खैरे कार्यक्रमातून निघून गेल्याचं पाहायला मिळालं. जाता जाता खैरेंनी हे घटनाबाह्य पालकमंत्री असल्याची टीकाही केली....दरम्यान खैरेंच्या टीकेवर संदीपान भुमरेंनींही जोरदार प्रत्युत्तर दिलंय
Continues below advertisement
Tags :
Chandrakant Khaire Program Opposition Leader Guardian Minister Attendance Ambadas Danve Aurangabad Greetings : Republic Day Controversy MLA Sanjay Shirsat Shinde Group Thackeray Group MP Imtiaz Jalil Sandipan Bhumre Flag-Wanding