Maharashtra winter session: हिवाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता

हिवाळी अधिवेशनानंतर म्हणजेच जानेवारी महिन्यात राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे... तर दुसरीकडे याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचं काँग्रेस नेत्यांकडून सांगितलं जातंय. 
भोरचे आमदार संग्राम थोपटेंचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या मतदानानं व्हावी यासाठी नियमात बदल करण्यात आला आहे. या नियमाला आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. तर विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा आता दिल्ली दरबारी गेल्याचं कळतंय...काँग्रेसच्या तीन ज्येष्ठ नेत्यांची नावं विधानसभा अध्यक्षपदाच्या यादीत चर्चेत होती... ही तीन नावं कुणाची हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही... मात्र हे तिन्ही नेते स्वतःकडे सध्या असलेलं मंत्रिपद सोडून विधानसभा अध्यक्षपद घेण्यास तयार नसल्याचंही कळतंय...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola