Winter Assembly Session : विधानभवनावर आज दहा मोर्चे धडकणार, विधासभेत आज काय विशेष? संपूर्ण विश्लेषण

Continues below advertisement

Winter Assembly Session : विधानभवनावर आज दहा मोर्चे धडकणार, विधासभेत आज काय विशेष? संपूर्ण विश्लेषण
मराठा आरक्षणावर मंगळवारी सुरु झालेली चर्चा आजही दिवसभर सुरु राहिल. विधानसभेत सकाळी ११ पासून चर्चेला सुरुवात होईल. तर विधानपरिषदेत आज दुपारी साडेतीन वाजता चर्चा होणार आहे. तर दुसरीकडे आज एकूण दहा मोर्चे विधानभवनावर धडकणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने संगणक परिचालकांचा मोर्चा तसंच लहुजी शक्ती सेनेचा मोर्चा लक्षणीय ठरण्याची शक्यता आहे. याशिवाय शाहीर आणि कलावंतांचा मोर्चा तसेच कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचा मोर्चाही महत्त्वाचा ठरणार आहे. याशिवाय बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावर ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे. बारसूमधील माती परीक्षणावेळी झालेल्या आंदोलनादरम्यान ३०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल झाले होते. हे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी आज सर्व आमदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून पत्र देणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram