ABP News

Police Transfer | ठाणे, पुणे, नागपूरचे आयुक्त बदलणार? राज्यातील पोलीस खात्यात मोठ्या बदलांची शक्यता

Continues below advertisement

महाविकास आघाडी सरकार राज्याच्या पोलीस विभागात मोठे फेरबदल करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसात राज्यात मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहे. ठाणे, पुणे, नागपूर, मीरा-भाईंदर आयुक्तांसह मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त, कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त तसेच अनेक आयजी रँक अधिकारी यांच्यांही बदल्या करण्यात येणार आहेत.

यावेळी कोणताही वाद निर्माण होऊ नाही यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून अंतिम आदेश देतील असं कळतंय. गेल्या वेळी मुंबई डीसीपींच्या बदलीबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर सरकारमध्ये समन्वय नसल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram