Shivshakti Bhimshakti : शिवशक्ती भिमशक्तीच्या राजकीय प्रयोगाचा दुसरा अंक रंगणार?
शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आता नव्या राजकीय समीकरणांची मांडणी होताना दिसतेय. बंडखोरीनंतर शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत राजकीय सलगी केली होती. यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भिमशक्तीच्या राजकीय प्रयोगाची शक्यता वर्तवली जातेय. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. २० नोव्हेंबरला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीची शक्यता असून या भेटीत काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Tags :
Politics Political Alliance Alliance Talks Maharashtra Insurgency In Shiv Sena Maharashtra Arrangement Of Political Equations Sambhaji Brigade Shivshakti Bhimshakti Possibility Of Political Experiment