Gautami Patil : राजकारणात कधीही जाणार नाही, गौतमी पाटीलचं स्पष्टीकरण
महिला अत्याचार घटनेवर गौतमी पाटील यांनी अमरावतीत एबीपी माझाशी बोलतांना एक मोठं विधान केलं आहे.. गौतमी पाटील म्हणाली की, मागील काही दिवसात आपण महिला अत्याचाराच्या घटना बघितल्या... इथं बाहेरगाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते... स्वतःची काळजी घ्या... लढायचं राहिलं तर बिनधास्त लढा.. कुणाच्या दबावाखाली राहू नका... आवर्जून नडा असं वक्तव्य गौतमी पाटील यांनी केलं आहे.. तसेच मी राजकारणात अजिबात जाणार नाही असेही गौतमी पाटील बोलल्या.. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी यांनी पाहूया....
अमरावतीत ही माझी पहिलीच वेळ आहे आणि इथे मिळालेले प्रेम बघून मला खूप बरं वाटलं... प्रेक्षकांचं आणि महिला वर्गाचं प्रेम बघून छान वाटलं...
मी यापूर्वी देखील सांगितलेला आहे माझा आणि राजकारणाचा काही संबंध नाही... मी एक कलाकार आहे... मी कला दाखवते... *मी राजकारणात अजिबात जाणार नाही...*
*मागील काही दिवसात आपण महिला अत्याचाराच्या घटना बघितल्या... इथं बाहेरगाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते... स्वतःची काळजी घ्या... लढायचं राहिलं तर बिनधास्त लढा.. कुणाच्या दबावाखाली राहू नका... आवर्जून नडा...*